महाराष्ट्र

अकोलासाठी 185 कोटींच्या निधीवरून बच्चू कडूंची नाराजी

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५, वाशिम १८५ तर अकोलासाठी १८५ कोटीचा निधी देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोल्यासाठी थोडा निधी वाढवून दिल्यामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

"मी सरकारमध्ये आहे त्यामुळे बोलू शकत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून निघावा याकरिता आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही, पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू," असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं.

विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अकोला जिल्ह्यासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ती १८५ कोटी रुपये करण्यात आली आहे, याशिवाय अमरावतीची तरतूद २८५ वरून ३०० कोटी, यवतमाळसाठी ३१० वरून ३२५, बुलढाणा जिल्ह्यासाठी २८५ वरून २९५ तर वाशिम जिल्ह्यासाठी तरतूद १४० कोटी रुपयांवरून १८५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वाशिम जिल्हा हा आकांक्षित (मागास) जिल्ह्यात मोडत असल्याने वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी मात्र निधीच्या वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे संकेत दिले.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय