जागतिक टंचाईमुळे इंधनाचे दर जवळजवळ रोजचं वाढत आहेत. पण २०१२ मध्ये रामदेव बाबांनी काय केलं की, पेट्रोल ३० रूपयांत मिळेल हि युक्ति सांगितली होती. "देशात काळा पैसा परत आला तर, पेट्रोल ३० रूपयांत मिळेल." असं ट्विट २०१२ मध्ये त्यांनी केलं होतं. परंतु कालांतराने हे ट्विट डिलीट केलं.
आता युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी बुधवारी बाबा रामदेव यांचं या ९ वर्ष जुन्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. "ट्वीट डिलीट करून तुम्ही कुठे चाललात," असा टोला त्यांनी लगावला आहे.