महाराष्ट्र

इच्छा तेथे मार्ग! नुकसान टाळण्यासाठी भर पावसात शेतकऱ्याने केली काकडीची तोडणी

शेतकऱ्याची छोटीशी कृती किरकोळ कारणासाठी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु, अडचणींवरही मात करता येते हे जळगावच्या एका शेतकऱ्याने सिध्द करुन दाखवले आहे. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी पाचोरा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी भर पावसातही काकडीची तोडणी केली आहे. या शेतकऱ्याची छोटीशी कृती किरकोळ कारणासाठी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे गावातील सुनील रंगराव पाटील या शेतकऱ्याने आपल्या सव्वा एकर शेतामध्ये काकडीच्या पिकाची लागवड केली. आतापर्यंत सुनील पाटील यांनी आपल्या शेतात सहा वेळा काकडीची तोडणी केलेली आहे. मात्र, पुन्हा तोडणीला आलेली काकडी व त्यातच सुरू असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे तोडणी अशक्य होती. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मात्र, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सुनील पाटील यांनी होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती देत शेतमजुरांना काकडी तोडणी करण्यासाठी विनंती केली. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांनी देखील शेतात काम करण्यास नकार दिला. मात्र, संभाव्य नुकसानीची कल्पना देत शेतमजुरांचे मन परिवर्तन करण्यात सुनील पाटील यांना यश आले.

यानंतर सुनील पाटील यांनी पाचोरा शहरापासून ते आपल्या शेतापर्यंत शेतमजुरांना आणण्यासाठी व्यवस्था केली. शेतमजुरांनीही सुनील पाटील यांना साथ देत भर पावसात चिखलाचा विचार न करता काकडीची तोडणी केली. त्यामुळे इच्छा असली तर आपण काहीही करू शकतो हा संदेशच सुनील रंगराव पाटील या शेतकऱ्याने या कृतीतून दिला असून किरकोळ कारणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कृती प्रेरणादायी अशीच आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे