सचिन बडे|औरंगाबाद
मालकाने कामाचे पैसे दिले नाही म्हणून औरंगाबाद (Aurangabad)जिल्ह्यातील कन्नड येथील एका मजुराने स्वतःच्या मालकाला बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न केला. सात ते दहा हजार रुपये दिले नाही म्हणून हा प्रकार केला. फक्त सात ते दहा हजार रुपये मालकाने कामाचे दिले नाही त्यामुळे दुकानात इलेक्ट्रॉनिक्स चे काम करणाऱ्या मजूर रामेश्वर मोकासे याने थेट स्वतःच्या मालकाला उडवण्याचा डाव रचला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहर येथील फर्निचरचे दुकान उघडत असताना दुकान मालकाला दुकानासमोर मोबाईलचा बॉक्स दिसला. हा बॉक्स उघडला असता त्यात बॉम्ब सदृश वस्तू दिसली. त्यानंतर तातडीने पोलीसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी ही हा बाँब निकामी केला. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन चार पथके नेमली.
पोलिसांनी दुकानाजवळ हा बॉम्ब कोणी ठेवला, त्याची चौकशी सुरु केली. यावेळी दुकानावर काम करणाऱ्या बारावी पास मजुरावर संशय आला. काही दिवसांपासून तो दुकानावर काम करत होता. परंतु त्याच्या मजुराचे पैसे दिले नाही. त्यामुळे या मजुराने बॉम्ब ठेवल्याचा संशय हा वाढू लागला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण माहिती समोर आली. मालकाने कामाचे पैसे दिले नाही म्हणून मजुराने मालकाला बॉम्बने उडवण्याचा डाव रचला होता. या प्रकरणी मजूर रामेश्वर मोकासे याला पोलिसांनी अटक केली असून १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.