मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या (Aurangabad) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी होणाऱ्या सभेबाबत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. तसेच परवानगी देताना काही अटी आणि शर्ती सुद्धा घालून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बहुचर्चित औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.
मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे.
अशातच काल (बुधवारी) मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभास्थळाची पाहणी केली, तसेच पोलिसांचीही भेट घेतली होती. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच, मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली.
राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्थी :
ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
वाहन पार्किंगचे नियम पाळावे
सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये