महाराष्ट्र

औरंगाबाद महानगरपालिकेत नोकरभरती;तरुणांना संधी

Published by : Lokshahi News

औरंगाबाद महापालिकेत नोकरभरती सुरू होणारआहे.महापालिकेत एका हजारपेक्षा जास्त जागांवर भरती होऊ शकते.

महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदानुसार सध्या साडेपाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान, राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे.

सेवा भरती नियमांची फाईल मंजूर झाल्यानंतरच महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. ऑगस्टच्या अखेरीस शासनाकडून सेवाभरती नियमांना मंजुरी मिळू शकते. त्यानंतर पुढील दोन महिने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेला नोकरभरतीची तयारी करता येईल. आवश्‍यकतेनुसार कशी पदे भरता येईल, याची तयारी करून डिसेंबर अखेरपर्यंत नोकरभरती केली जाऊ शकते, अशी शक्यता महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी