महाराष्ट्र

किरीट सोमय्यांना रामदास कदमच माहीती पुरवत होते…फोन कॉलचा भांडाफोड…

Published by : Lokshahi News

शिवसेना संदर्भातील सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल परब अडचणीत असताना आता एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मटेरियल पुरविल्याचा दावा केला जातोय. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिप प्रकरणात आता असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहे. किरीट सोमय्यांना माहिती देणारा कोण?, शिवसेनेतील घरचा भेदी कोण? असे सवास उपस्थित होत आहेत.

रामदास कदमांनी फेटाळले आरोप

विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसाणीचा दावा टाकलेला आहे.

प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माज्या हातून घडणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.

याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील अशा क्लीप व्हायरल करुन बदनाम केलं गेलंय. मी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मंत्रीपद स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं होतं. माझी कोणतीही नाराजी नाही. खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणावरुन मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटू.

सेना नेत्यांनी साधली चुप्पी

रामदास कदम यांचा वायरल झालेल्या ऑडियो क्लिप वर शिवसेनेकडून मात्र प्रतिक्रया देण्यास नकार देण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आपण सध्या या प्रकरणावर भाष्य करणार नाही असे म्हणत, सावध भूमिका घेतलीय. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्याची ऑडियो क्लीपवर चुप्पी साधल्याचे बोलले जात आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय ?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अनिल परब यांच्या बांद्रेमधील कार्यालय तोडण्याविषयी संभाषण आहे…आणि याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम व्हेरी गूड असं म्हणताहेत… एवढंच नाही तर गुन्हा दाखल झाला तर परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असंही कदम म्हणताहेत…. ही कथित ऑडिओ क्लिपजशी आहे तशी लोकशाही दाखवत आहे… या ऑडिओ क्लिपला लोकशाही पुष्टी करत नाही….

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु