सुशांत डूंबरे | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पालिका इमारतीत मोठा गोंधळ उडाला होता. याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगेसह काही महिलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भाजप नगरसेविका आशा शेडगे यांच्या प्रभागातील दापोडी परिसरात पालिकेकडून खोदकाम सुरू आहे. याचा नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नगरसेविका शेडगे आपल्या महिलांना घेऊन आयुक्त कार्यालयासमोर पोहचल्या होत्या. यावेळी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा त्यांचा हेतू होता, पण ती शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. मग या महिलांनी आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर शाई फेकली. त्यामुळे पालिका इमारतीत गोंधळ उडाला. मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी भाजपा नगरसेविका शेडगे सह काही महिलांना ताब्यात घेतलं आहे.