संजय देसाई | राज्यात बैलगाडा शर्यतीवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. तालिबान सारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत नी केला आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
आटपाडीच्या झरे या ठिकाणी उद्या 20 ऑगस्ट रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. आणि या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासनाने पडळकर यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून आसपास 9 गावात संचारबंदी लागू केली आहे तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान या नाका बंदीचा फटका कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनाही बसला. पोलीस प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी जात असताना रोखून धरण्यात आले.परवानगी नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.मात्र त्यांनी रस्त्यावरच ठिय्या माडण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांच्या कडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.