अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. दरम्यान, उपचारानंतर हेरंब कुलकर्णींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
हेरंब कुलकर्णी सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. हेरंब कुलकर्णी शनिवारी हे शाळेतून परत असताना ही घटना घडली. तीन तरुणांनी त्यांची गाडी अडवत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून ४ टाके पडले आहेत.
सध्या हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर असून ते विश्रांती घेत असल्याचं पत्नी प्रतिमा यांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही कोणाला अटक न केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.