महाराष्ट्र

Shripad Chindam | नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Published by : Lokshahi News

संतोष आवारे | एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याच्यासह भाऊ श्रीकांत छिंदम‌,  महेश सब्बन यांच्या सह ४० जणांविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भागीरथ बोडखे हे दिल्लीगेट येथे ज्यूस विक्रीचा व्यवसाय करतात. 9 जुलै रोजी शटर उघडून झाडलोट करत असताना नगरसेवक श्रीपाद छिंदम सह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम‌,  महेश सब्बन यांच्या सह ४० जणांनी जमावांसह मारहाण करत लुटमार केली. श्रीपाद छिंदम यांनी टपरीमधील सामान फेकून देत नुकसान केले. तसेच गल्ल्यातील 30 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणही केली.

दरम्यान आता याप्रकरणी भागीरथ यांच्या फिर्यादीवरून दमदाटी, जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम यांच्यासह भाऊ श्रीकांत छिंदम‌, महेश सब्बन यांच्या सह ४० जणांविरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shraddha Arya: लोकप्रिय सिरियल "कुंडली भाग्य"मधील अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याची चाहूल

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...