थोडक्यात
यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढल्यामुळे लोकांनी मोबाइलद्वारे लहानमोठी पेमेंट्स करणे सुरू केले आणि कॅश बाळगण्याचे प्रमाण कमी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे देशभरातील एटीएमच्या संख्येत घट
यूपीआय आणि डिजिटल पेमेंट्समुळे पारंपारिक कॅश विथड्रॉवलच्या गरजा कमी झाल्यामुळे एटीएम नेटवर्क्सवरील दबाव कमी
देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे. याचा परिणाम आता एटीएम होत आहे. कारण एटीएमची संख्या आता कमी होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे. या शिवाय शहरांमध्येही कमी ग्राहक असलेली एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलल्या आहेत. यूपीआय हाताळण सोप्प झाल्यामुळे एटीएमचा वापर कमी होत असल्या समजत आहे.
आकड्यांकडे पाहीले तर ऑफ साईट एटीएमच्या संख्येत गेल्या चार वर्षांत घट सुरु आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,383 होते
सप्टेंबर 2022 मध्ये ऑफ साईट एटीएम 97,072 झाले सप्टेंबर 2023 मध्ये ऑफ साईट एटीएम 93,751 राहीले
सप्टेंबर 2024 मध्ये ऑफ साईट एटीएम 87,838 उरले
म्हणजे साल 2021 तुलनेत साल 2024 मध्ये ऑफ साईट एटीएमची संख्या सुमारे 10 टक्के घटली.