महाराष्ट्र

आशिष शेलारांच्या मेंदूला लकवा मारलाय, मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर

Published by : left

"ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?" असा खोचक सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता.या सवालावर आता मला वाटतंय यांच्या मेदूला लकवा आलाय की काय", असं प्रत्युत्तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांना दिलं आहे.

"आशिष शेलार (Ashish Shelar) यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई लागली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही स्वप्न पडत आहेत. ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत, लकवा वगैरे शब्द वापरतायत. मला वाटतंय यांच्या मेदूला लकवा आलाय की काय", असं मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी शेलारांना (Ashish Shelar) टोला लगावलाय.

शिवसैनिक खपवून घेणार नाहीत

"आशिष शेलारांना (Ashish Shelar) मी इशारा देते. मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही बोललं जातंय, ते शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना जनतेच्या तब्येतीची काळजी आहे. जे निर्देश केंद्र सरकारकडून कोरोनाबाबतचे निर्देश येतात, त्याचं पालन आम्ही तंतोतंत करत आहोत. जे टास्क फोर्स सांगतो, ते करायला हवं. तुम्ही काही डॉक्टर नाही आहात, वैज्ञानिकही नाही आहात. त्यामुळे उगीच काहीतरी बोलून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा तुमचा प्रयत्न बंद करा", असं मनीषा कायंदे (manisha kayande) म्हणाल्या आहेत.

आशिष शेलार काय म्हणाले ?

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुढी पाडव्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍याची शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?" असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावरून आता मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर पलटवार केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result