महाराष्ट्र

Pandharpur Wari : आषाढीनिमित्त श्री विठ्ठलाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथापरंपरेप्रमाणे रविवार 10 जुलै 2022 रोजी मध्यरात्री 2.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथापरंपरेप्रमाणे रविवार, 10 जुलै 2022 रोजी मध्यरात्री 2.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

दरम्यान शनिवारी 09 जुलैला रात्री 8.45 वा. पुणे विमानतळ येथून मोटारीने पंढरपूर जि. सोलापूरकडे प्रयाण. रात्री 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन. रात्री 11.35 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी’ समारोप सोहळा. रात्री 11.45 वा. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुक्काम करणार आहेत.

रविवार, 10 जुलै रोजी मध्यरात्री 2.00 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदीराकडे प्रयाण. मध्यरात्री 2.30 ते पहाटे 4.30 वा. श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदीरात शासकीय महापूजा व राखीव. पहाटे 5.30 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन. पहाटे 5.45 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण. सकाळी 6.15 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने पंचायत समिती, पंढरपूरकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम. दुपारी 12.30 वा. पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 3.00 वा. शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे राखीव. दुपारी 3.00 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...