संगमनेर तालुक्यातील प्रतिआळंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नान्नज दुमाला येथे आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी निमित्ताने 2 क्विंटल खिचडीचे वाटप करण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माऊलीसह पांडुरंग विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा ग्रामस्थांच्या वतीने आज करण्यात आली. यावेळी येथे दोन क्विंटल खिचडी शिजवण्यात आली आहे. या खिचडीचे वाटपही भाविकांना करण्यात आले.
मोजक्या भाविकांमध्ये भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.फराळ वाटप कार्यक्रम गावातील युवकमित्र, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पार पडला.यासंदर्भात सरपंच भिमराज चत्तर यांनी अधिकची माहिती दिलीये.