बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला NCB ने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा सहकारी प्रभाकर साईलने या घटनेत नवीन टविस्ट आणला आहे. शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. तर समीर वानखेडेला 8 कोटी देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा करण्यात आला.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
गोसावी आणि सॅम यांनी समीर वानखेडेंशी 18 कोटी आणि 8 कोटींची चर्चा केली होती. क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.