ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. दरम्यान या जामीनानंतर लगेचचं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे.
सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान या जामीनानंतर लगेचचं राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे या ट्विटनंतर ते नेमका काय खुलासा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.