लोकशाही न्यूज नेटवर्क
ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणाला आता आणखी नवीन वळण लागलं आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावलं आहे. निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. निकिता जेकब या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करतात.
टूलकिट प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत टि्वट करताना टूलकिटचा वापर केला होता. यानंतर तिनं काही वेळात हे टि्वट डिलिट केलं होतं. यानंतर दिल्ली पोलिसांनी बंगळुरू येथून २२ वर्षीय दिशा रवि हिला अटक केली. आता निकिता जेकब यांच्या अटक वॉरंटमुळे या प्रकरणाला नवीनच वळण मिळालं आहे.
टूलकिट म्हणजे काय?
जगात दररोज वेगवेगळी आंदोलनं होत असतात. black lives matter असो वा climate change campaign अशी आंदोलन होत असतात. यासाठी एक कृती कार्यक्रम म्हणजेच अॅक्शन प्लॅन बनवला जातो. ज्यात हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.