रवी जयस्वाल, जालना | जालन्यात बुलढाणा अर्बण बँकेत सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात अंदाजे 70 लाखांच्या सोन्यासह 25 लाखांची कॅश दरोडे खोरांनी लुटून नेलीये. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकचं खळबळ माजली आहे.
शहागड येथील बुलढाणा अर्बण बँकेत सशस्त्र दरोडा पडलाय.यामध्ये अंदाजे 70 लाखांच्या सोन्यासह 25 लाखांची कॅश दरोडे खोरांनी लुटून नेलीये.आज सायंकाळी पाचच्या सुमारास बँक बंद होण्याच्या वेळेला तीन ते चार दरोडेखोर बुंदुकींसह बँकेत घुसले आणि पूर्ण बँक लुटून नेली. यामध्ये अंदाजे 70 लाखांचं सोनं आणि 25 लाखांची कॅश लुटून नेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरु आहे.