परभणी जिल्ह्यात पुढील ४ वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) व रूग्णालय (Hospital) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीय (Cabinet Meeting) या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत परभणी (Parbhani) येथे पुढील ४ वर्षात ६८२ कोटी रूपये खर्च करून १०० प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) व ४०३ खाटांचे संलग्नित रुग्णालय (Hospital) उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.