रुपेश वायभट|पैठण: बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थांच्या वतीने दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, तसेच संत निवृत्तीनाथ व सोपानकाका यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा याही वर्षी संस्थांनी कायम ठेवली. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे दरवर्षी संत मुक्ताबाई संस्थानकडून आपल्या तीनही भावंडांना राखी पाठवली जाते.
मागील काही वर्षांपासून ही परंपरा संस्थाने कायम ठेवली असून, मुक्ताई संस्थांकडून बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्याने ही संस्थाने केवळ जोडली गेलेली नसून, प्रेमाचा ओलावाही निर्माण झाल्याची माहिती सेवेकरी भागवत पाटील यांनी दिली.