अंजली दमानिया यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अंजली दमानिया ट्विट करत म्हणाल्या की, हा केविलवाणा आक्रोश बघा. त्या बिचाऱ्या स्त्री चे किंचाळणे तिचे घर वाचवण्यासाठी आहे. हे कोणी घुसखोर नाहीत की भाडेकरू नाहीत. हे त्यांच्या घरांचे मालक आहेत. पण अंधाधुंद करणाऱ्या राजकारण्यांविरोधात सामान्य माणूस लढणार कसा ? SRA सारख्या सर्व सरकारी संस्था केवळ राजकीय दबावाखाली काम करत आहेत का? जे योग्य आहे, लोकहिताचे आहे , त्यासाठी उभे राहण्यासाठी त्यांना पाठीचा कणा नाही का?
श्री @rautsanjay61, तुमचा भाऊ आमदार सुनील राऊत हे नागपुरातील कुख्यात विकासक अतुल शिरोडकर ज्यांनी फर्स्ट सिटी प्रकल्पात केवळ निष्पाप घर खरेदीदारांनाच लुटले नाहीत तर आता 18000 चौरस मीटरचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पण फक्त 89 लाखत ? भांडुपमध्ये ८९ लाखात २ बीएचके मिळतो का? प्लॉट भोळ्या मध्यमवर्गीय लोकांचा आहे. ते अतिक्रमण करणारे किंवा भाडेकरू नाहीत, परंतु मालक आहेत. ह्या अतुल शिरोडकर यांच्या मिहान येथील कार्यालयात महावितरणची वीजचोरी केल्याचा आरोप होता. आता आमदार सुनील राऊत यांच्या मदतीने साईनगर चाळ भांडुप येथे दहशत पसरवत, बेकायदेशीरपणे चाळ पाडत आहेत. लोक कसे लढणार ? पोलिसांची मदत नाही, एसआरएची मदत नाही, सर्व केवळ राजकीय दबावाखाली काम करत आहेत.
सर्व वस्तुस्थिती माहीत असूनही आणि हे प्रकरण AGRC मध्ये असतानाही, ACS गृहनिर्माण श्रीमती वल्सा नायर किंवा SRA CEO महेंद्र कल्याणकर कोणतीही कारवाई करत नाहीत. आमदार सुनील राऊत यांच्याशी मी आज बोलले , वाटलं कदाचित त्यांना तथ्य माहीत नसेल, पण त्यांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. Completely compromised. DEMOLITION ताबडतोब थांबले पाहिजे. आता लढा केवळ विकासक अतुल शिरोडकर विरुद्ध नाही, तर आमदार सुनील राऊत आणि एसआरए यांच्या विरोधातही आहे. असे अंजली दमानिया म्हणाल्या.