पुण्यातील एका सरकारी शाळेत पोषण आहारा ऐवजी पशु खाद्य दाखल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे पालकवर्गातून या घटनेचा निषेध होत आहे. या प्रकरणी आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची योजना हि राज्य सरकार चालवले. या योजनेतर्गत सर्व शाळांना पोषण आहाराचा संपूर्ण माल वितरीत करण्यात येतो. मात्र पुण्यातील एका शाळेत पोषण आहार येण्याऐवजी चक्क न्युट्री रिच पशु आहार नामक पशु खाद्य आला होता. जवळ एक टेम्पो भर हा माल शाळेत दाखल झाला होता. त्यामुळे पालकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणावर आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी शाळांमध्ये पोषण आहाराचा माल वितरीत करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. दरम्यान हि घटना दुदैवी असल्याचे सांगत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.