माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे .त्यानंतर त्यांच्या अटकेची टांगती तलवार अजून कायम आहे.
सीबीआयने दाखल केलेला गुन्हा हा योग्यच असल्याचं सांगत उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. या निकालाला अनिल देशमुखांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांची याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश योग्यच आहे.आम्ही त्यात कोणताच हस्तेक्षेप करण्यास इच्छुक नाही,असं सर्वोच्च न्यायालाने सांगितलं आहे.याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुखांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी समोर हजर झालेले नाहीत.