लोकशाही न्यूज नेटवर्क
सोशल माध्यमांचा वापर करून लोकांना फसवण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणत वाढले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सोशल माध्यमांवर आधारित सेक्युरिटी प्रकल्प लवकरच राबवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे परंतु फायद्यां सोबतच आपल्याला अनेक तोट्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. सायबर क्राईम हा महत्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र मुंबई पोलीस दल काम करत आहे. सध्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूकचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये ९०० कोटींचा सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करण्याचे काम, अफवा पसरवण्याचे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे दिसते. अशा घटना थांबवण्यासाठीही या ठाण्यांचा उपयोग होईल. फेक प्रोफाईल तयार करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याकडे लक्ष देता येईल. जो कुणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करील त्यांना धडा शिकवण्याचे काम मुंबई पोलीस करतच राहील असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.