महाराष्ट्र

Angarki Chaturthi | सिद्धीविनायकांच्या ऑनलाइन दर्शनाची २४ तास सोय

Published by : Lokshahi News

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे.

कोविड-19 संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाउलोड करून घरातूनच श्रींच्या दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा

सोमवार मध्यरात्री १२.१० ते १२.२० श्रींची काकड आरती, मध्यरात्री १२.२०ते १.२० पर्यंत श्रींची महापूजा व अभिषेक, मंगळवार पहाटे ३.३० ते ४ वाजेपर्यंत श्रींची महाआरती, दुपारी १२.०५ ते १२.२० पर्यंत श्रींनी नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती, रात्री ८.३० ते रात्री १० वाजेपर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य, महाआरती आणि रात्री १०.३० वाजता शेजारती नंतर मंदिर बंद होणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती