महाराष्ट्र

कुठून येतो आत्मविश्वास देवजाणे…, बजेटच्या प्रतिक्रियेवरून अमृता फडणवीस ट्रोल!

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (सोमवार) 2021-2022 सालचा अर्थसंकल्प मांडला. त्याबाबत विरोधकांनी कडाडून टीका केली. तर, सत्ताधारी नेत्यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी उत्साहाच्या भरात ट्विट करत अर्थसंकल्पाची प्रशंसा केली अन् त्या ट्रोल झाल्या.


निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प गेल्या 100 वर्षांत देशाने पाहिलेला नाही, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. यावरून नेटिझन्सने जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खूप जास्त भावनिक झालाय… आणि भावनेच्या भरात तुम्ही काय बोलताय याचं भान तुम्हाला राहिलेलं नाही… देश स्वतंत्र होऊन अजून 100 वर्ष झालेली नाहीत,' असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. तर, अन्य एकाने एवढा आत्मविश्वास कुठून येतो, असा सवाल केला आहे.
तर अन्य एकाने, 'देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झालीत आणि आजचं बजेट तुम्हाला 100 वर्षांतलं सर्वात चांगलं बजेट वाटतंय? म्हणजे गेल्या 6 वर्षांत मोदी सरकारनं जे बजेट दिलं ते पण फालतू होतं, असं म्हणायचं आहे का तुम्हाला,' असा सवाल केला आहे. तसेंच अमृता फडणवीस यांना इंग्रज कुरिअर करत असतील ना दरवर्षी बजेटची प्रत, असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. तर, 'भारत स्वतंत्र होऊन 100 वर्षें उलटली, हे आम्हाला समजलंच नाही; तुमच्यामुळे समजलं,' असे एकाने म्हटले आहे.

Election Commission: राज्यात आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल

Rahul Gandhi नाराज? जागावाटपाबाबत काय म्हटले राहुल गांधी?

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

लहान मुलांचे कान टोचण्याच्या परंपरेमागील नेमक कारण काय? जाणून घ्या...

Rohit Patil VS Sanjay kaka Patil: तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत