Amravati Murder Case Team Lokshahi
महाराष्ट्र

Nupur Sharma : अमरावतीतील कोल्हे यांची हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान बेड्या

उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Published by : Team Lokshahi

Nupur Sharma : अमरावतीतील कोल्हे यांची हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान बेड्या

बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असं त्याचं नाव असून तो एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली होती आता इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या केली होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली.

सहा आरोपींपैकी दोन आरोपींना डॉ. युनूस खान बहादूरखान याला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, आतिप रशीद याची तुरुंगात रवानगी केली आहे. यापूर्वीच्या चार आरोपींना चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सदर गुन्ह्यास कलम१२०(ब) आणि १०९ भादवी कलमे वाढवण्यात आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती