जगभरात मंकीपॉक्सचा धोका निर्माण झाला आहे. पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे ट्विट करत म्हणाले की, एम.पॉक्स आजाराला सीमेवरच रोखावे ! आपला देश कोविडच्या परिणामांतून बाहेर पडत असतानाच देशासमोर एम.पॉक्स या संसर्गजन्य आजाराचे नवीन आव्हान उभे राहिले आहे. आफ्रिकन देशांमध्ये या आजाराने थैमान घातले असून शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे.
आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची संख्या व आपल्या शेजारील देशांमध्ये रूग्ण आढळल्याची वस्तुस्थिती पाहता भारताने वेळीच सावध होऊन या आजाराला भारताच्या सीमेवर रोखले पाहिजे. यासाठीच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी @narendramodi यांना पत्र लिहून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चाचणी व विलगीकरणाच्या सुविधा युद्धपातळीवर निर्माण करण्याची विनंती केली.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कोविडच्या वेळी चाचणी व विलगीकरण सुरू करण्यास विलंब झाल्याचे परिणाम संपूर्ण देशाने भोगले आहेत, त्याची पुनरावृत्ती टाळावी हीच केंद्र सरकारला विनंती. असे अमोल कोल्हे म्हणाले.