महाराष्ट्र

‘आता मिसरुड फुटलेल्या’…अमेय खोपकरांची मिटकरींवर आगपाखड

Published by : Lokshahi News

सध्या राज्यात शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. राज यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या उदयानंतर जाती-जातींमध्ये द्वेष वाढला, असं वक्तव्य केलं होतं. यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना राज यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचावी असा सल्ला त्यांना दिला. त्यावर पुन्हा राज यांनी मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत, असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे राज्यात हा विषय सध्या चर्चेचा बनला.

दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टि्वट करून राज ठाकरेंवर टीका केली. आता मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी मिटकरी यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले खोपकर?
'आता कुठे मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं राजसाहेबांचं नुसतं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राजसाहेबांवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या अतिसामान्य नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव', असं टि्वट खोपकर यांनी केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी