२३ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाटाला लागलेलं ग्रहण अजून संपलेले नाही. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्ता खचलेल्या ठिकाणी विरुद्ध बाजूला रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
तसेच सध्या सुरू असलेले बांधकाम ओलसर असल्याने ते सुकण्यासाठी कालावधी लागणार आहे.त्यामुळे वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तब्बल १० दिवस घाट बंदच आहे.
व्यापारी वर्गाला यामुळे प्रचंड नुकसानी ला सामोरे जावे लागत आहे.मात्र नैसर्गिक आपत्ती मुळे घाटाचे झालेले नुकसान प्रचंड असल्याने वाहतूक पूर्वरत होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे .
सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील हे स्वतः आपल्या टीम सोबत काम सुरू असलेल्या ठिकाणी लक्ष ठेऊन आहेत.तसेच कोणतीही वाहतूक सध्या हया मार्गावरून होऊ नये यासाठी करडी नजर ठेऊन आहेत.
तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय हायवे यांची पाहणी झाल्यानंतर लहान चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.तोपर्यंत घाट बंदच असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांच्या आदेशा नुसार वाहतूक शाखा पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. सहाय्यक निरीक्षक श्री.पाटीलयांनी २२ जुलै रस्ता खचला असल्याने बंद ठेवल्याने अनर्थ टळला होता.
त्याच रात्री १० ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.रस्ता पाहणी वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासोबत पोलीस सहाय्यक उप निरीक्षक संजय उकार्डे,श्री. संसारे उपस्थित होते.त्यामुळे रस्ता केव्हा सुरू होतो पाहणे महत्वाचे ठरणार आहे.