महाराष्ट्र

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत 'सैराट' फेम आकाश ठोसर मैदानात

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आले होते.

Published by : Team Lokshahi

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणे जसे महत्वाचे असते, तसेच आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत सैराट फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर याने व्यक्त केले.

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आले होते. बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबईकर नागरिकांसह 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर ही सहभागी झाला होता. यावेळी आकाश म्हणाला, "भ्रष्टाचारविरोधात बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होते, याविषयी जमेल तिथे आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेकजण सजग होतील" .

अगदी पहाटे आलेल्या मुंबईकर मंडळींसोबत आकाशने मरीन ड्राईव्ह इथे मनसोक्त फोटो सेशनही केले. आपण लवकरच बहुचर्चित बाल शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आकाशने यावेळी सांगितले. यावेळी बोलताना आकाश फिटनेसबद्दलही भरभरून बोलला. आपण प्रत्येकाने शरीराची काळजी घ्यायलाच हवी आणि त्यासाठी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यायला हवा असे आकाशने सांगितले. एकूणच जनजागृतीबद्दल आयोजित केलेल्या या वॉकेथॉनला फिटनेस फंडा आवडीने जपणाऱ्या आकाशच्या उपस्थितीने सर्वांचाच उत्साह वाढलेला दिसला.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result