महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

Published by : Lokshahi News

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी हे बँकेसंदर्भात कधी, कुठला निर्णय घेतील हे सांगता येत नाही. राष्ट्रीयीकृत बँकादेखील अडचणीत आल्या आहेत, असा आरोप करत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारनं काही लाख कोटी रुपये मोठ्या उद्योगपतींना दिले आहेत, असा गंभीर आरोपही अजित पवारांनी केला. ते बारामतीमधील सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री असताना राज्य बँकेत जाऊ शकत नव्हतो तरीदेखील आमच्या चौकशा लागल्या. सीआयडीने चौकशी केली त्यात क्लीनचिट मिळाली. एसीबी चौकशी केली त्यातही क्लीनचिट मिळाली. आमचा दोष नसताना आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत अजित पवारांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...