महाराष्ट्र

गुलाबी जॅकेट आणि गुलाबी बस; आजपासून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन अजित पवार दर्शन घेणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रला विशेष महत्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, आमदार या यात्रेला उपस्थित राहणार आहेत. लाडकी बहिण योजनेसंदर्भात अजित पवार महिलांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे, होर्डिंग्स लावण्यात आले असून अजितदादांच्या गुलाबी जॅकेटचीही चर्चा रंगली आहे. यासोबतच या यात्रेतील गुलाबी बस देखील चर्चेचा विषय ठरत आहे. 31 ऑगस्ट रोजी गडचिरोलीत या जनसन्मान यात्रेची समाप्ती होणार आहे.

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात