जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच हा आरोप माझ्यावर आधीपासून होतोय, तसेच चौकशी करायची असेल तर सर्वांचीच करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी दिले.
अजित पवार म्हणाले, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.