महाराष्ट्र

‘मातोश्री’चं आमंत्रण आम्ही स्वीकारलं

Published by : Lokshahi News

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यातील राजकारणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस लवकरच मातोश्रीवर येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे, हा आमंत्रणाचा प्रकार असून आम्ही स्वीकारलं आहे, अशी सूचक प्रतिक्रिया भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली.


महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, आम्ही मातोश्रीसोबत कधीच संबंध तोडले नाही. पण त्यांनीच तोडले आहे. राऊतांचं वक्तव्य हे आमंत्रण असेल तर आम्ही स्विकारलं आहे, असं प्रत्युत्तर अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली. ते बीड येथे माध्यमांशी बोलत होते.

यावेळी मराठा समाजाच्या मोर्चा टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेनेने केले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागण्याची हिंमत सुद्धा शिवसेनेने केली, त्यामुळे तुम्ही भावनाशून्य होतात. गायकवाड आयोगाची मांडणी योग्य पद्धतीने केले नाही, तेव्हा कर्तृत्व हीन आहेत हे दिसून आले, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव; दर्यापूर तालुक्यातील घटना, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

Mahayuti Seat Sharing | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? दिल्लीत 3 तास खलबतं

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामधून वैभव नाईक यांना पुन्हा उमेदवारी? म्हणाले...

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार? गणेश नाईक घर वापसी करण्याची शक्यता