महाराष्ट्र

Ahmadnagar Fire | सिव्हिल सर्जनला हटवा, पिडब्लूडीचे इंजिनिअरला निलंबीत करा,मग चौकशी करा -बाळा नांदगावकर

Published by : Lokshahi News

संतोष आवारे | अहमदनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेनंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रुग्णालयाला भेट देत दुर्घटना झालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. सिव्हिल सर्जनला हटवा, पिडब्लूडीचे इंजिनिअरला निलंबीत करा, मग चौकशी करा, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केली.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देत दुर्घटना झालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्या कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्याशी एकूण आग प्रकरणा  संदर्भात चर्चा केली त्यावेळी पाहणी दरम्यान अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सिव्हिल सर्जन यांच्याशी झालेली चर्चा या अनुषंगाने असे दिसून येत आहे की या ठिकाणी फायर ऑडिटबाबत माहिती असतानाही या ठिकाणी असणाऱ्या तांत्रिक दुरुस्त्या या केल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तांत्रिक आणि बांधकामाची जबाबदारी संबंधित इंजिनिअर यांनी पार पाडल्याचे दिसून येत नसल्याचे प्राथमिक दिसत आहे. त्या अनुषंगाने आता जर या दुर्घटनेची चौकशी होत असताना जिल्हा रुग्णालयाचे विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक हेच त्या पदावर कार्यरत असतील तर ही चौकशी निर्धोक होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या पदावरून हटवण्यात आलं पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ही संबंधित इंजिनियर असतील त्यांनाही तात्काळ निलंबित केले पाहिजे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news