प्रशांत जगताप, सातारा
10 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास प्रतापगड येथील अफजल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास प्रशासनाने सुरूवात.
अफझल खानच्या कबरी परिसरात तब्बल 26 वर्षांपासून 144 कलम होतं.
अफजल खानच्या कबरी लगत तब्बल साडेपाच हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं.
हे अतिक्रमण तोडण्याचा आदेश 2007 मध्ये प्रतापगड उत्सव समितीच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने दिला होता.
तत्कालीन सरकारने कारवाई न झाल्यामुळे अखेर प्रतापगड उत्सव समितीने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. 2017 मध्ये हायकोर्टाने सरकारला बांधकाम तोडण्याचा अल्टिमेटम दिला.