शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP sanjay raut) यांच्यावर ईडीने कारवाई करत अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त केली. हे प्रकरण ताजे असताना आता राज्यातल्या आणखी एका नेत्यावर ईडीने कारवाई केली आहे. नेमके हे नेते कोण आहेत, ते पाहूयात..
ईडीने (ED Action) आज दोन वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या संपत्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर ईडीने कारवाई (ED Action) केल्याचे प्रकरण ताजे असताना, दुसरीकडे ईडीकडून ‘आप’च्या नेत्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आपचे नेते सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणात आपचे नेते सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्याने ही संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आज इडीकडून करण्यात आलेल्या या दोन मोठ्या करवाईंमुळे आप आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.