राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी युध्द पातळीवर सर्व्हे सुरु आहे. अशात, या सर्व्हेवर मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
पुष्कर जोग म्हटले की, काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार, अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे. पुष्करची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
पुष्कर जोगच्या वक्तव्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये संताप झालेला पाहायला मिळत आहे. यातच आता अभिनेता पुष्कर जोगने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. ही पोस्ट शेअर करत पुष्कर म्हणाला की, ‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो… अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी. असे पुष्कर जोग म्हणाला.