महाराष्ट्र

'महायुतीच्या रिपोर्टकार्डला, महाराष्ट्र डिपोर्टकार्ड नाव देईल'आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Published by : shweta walge

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महायुतीने सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर केला यावरुनच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले की, महायुतीने रिपोर्ट कार्ड काढले आहे, महाराष्ट्र याला डिपोर्ट कार्ड नाव देईल. उद्योग गेले डायमंड मार्किट डिपोर्ट केले गुजरातला.आमचे सरकार रोजगार रोजगार हेच काम असणार आहे. त्यानी रोजगार सुद्धा गुजरातला डिपोर्ट केल्याच ते म्हणाले.

काल आचारसंहिता लागली. मी सांगितले होतं अदानी साथीचे सगळे जिआर काढल्यावर आचारसंहिता लागेल. प्रत्येक बैठकीत जनतेला काही देतोय असे दाखवले लाडकी बहीण योजना टोल माफी असेलहे चांगले आहे. पण याच गोष्टीचा आडोसा घेऊन भयानक गोष्टी केल्यात त्या विचार करण्यासारख्या आहेत.

Shyam Manav: नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ

Rajendra Shingne | Vidhansabha | राजेंद्र शिंगणे लवकरच हाती तुतारी घेणार?

CM Shinde On Uddhav Thackrey | 'लाडकी बहीण योजनेला हात लावल्यास करेक्ट कार्यक्रम करणार

जालना जिल्हा प्रशासन लागले विधानसभेच्या तयारीला

पंकज भुजबळ यांची आमदार म्हणून नियुक्तीनंतर समीर भुजबळ माघार घेतील का?