Ashadhi Ekadashi Team Lokshahi
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi 2022 : स्वप्नील जोशीने शेअर केला पायी वारीचा अनुभव

अभिनेता स्वप्निल जोशी (Actor Swapnil Joshi) वाखरी ते पंढरपूर (Pandharpur) अशी पायी वारी चालत गेला. वारकऱ्यांसोबत अतिशय उत्साहात भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन स्वप्निल भारावून गेला.

Published by : Team Lokshahi

Swapnil Joshi Post : कोरोनानंतर विठ्ठल भक्तांना (Vitthal Bhakta) दोन वर्षांनंतर वारीमध्ये (Wari 2022) सहभागी होता आले. टाळ-मृदुंगांच्या गजरात विठुरायाचे नामस्मरण करण्यात वारकरी पंढरीच्या वाटेवर जात आहेत. भक्तीमय वातावरणात गेलेली ही वारी पंढरीत दाखल झाली. यंदाच्या वारीमध्ये मराठमोळे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिनेता स्वप्निल जोशी (Actor Swapnil Joshi) वाखरी ते पंढरपूर (Pandharpur) अशी पायी वारी चालत गेला. वारकऱ्यांसोबत अतिशय उत्साहात भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन स्वप्निल भारावून गेला.

स्वप्निल वारीचा आनंद अगदी खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत घेतला. स्वप्निल जोशीने वारकऱ्यांसोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोत त्याने लाल रंगाचा कुर्ता घातला असून डोक्यावर टोपी, कपाळी टिळा लावल्याचे दिसत आहे. वारकऱ्यांसोबत फोटो काढताना स्वप्निलच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीचा आनंद दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली. जी अतिशय लक्षवेधी आहे. विठ्ठल भेटीनंतर स्वप्निलने वारीचा अनुभव शेअर केला आहे.

काय आहे पोस्टमध्ये

स्वप्निल जोशीने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो ! अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली ! कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे ! बघू, पांडुरंग कधी संधी देतो !

पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही !

आम्ही picture मधले hero ! पण खरे हिरो हे वारकरी ! वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पाई वारी चालतात ! पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते ! त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं !

@1OTTofficial @narendrafirodia सर आणि आमच्या टीमने वारी मध्ये जे काम केलं आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, lost and found stalls असतील, ते पाहून खूप आनंद झाला ! मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा अभिमान आहे !

लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत !

हा "प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच ! माझी आजी म्हणायची..."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !"

काल मला कळलं ती काय म्हणायची !

जय हरी विठ्ठल !

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result