महाराष्ट्र

थाळीनाद कोरोना योद्ध्यांसाठी नाही तर प्रभूरामासाठी; 'या' अभिनेत्याच्या दावा, पण सत्य नेमकं काय?

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना योद्ध्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना योद्ध्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर आता अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी एक नवा दावा केला आहे. त्यांचा हा दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

राहुल सोलापुरकर म्हणाले की, आपल्यापैकी कोणालाच माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो. आपल्याला आठवत असेल एक दिवसाचा पहिला प्रातिनिधीक बंद, २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी आवाहन केलं. लगेचच सांगितलं उद्यापासून भारत बंद होत आहे. किमान पुढचे ३ महिने तरी. त्यानंतर २५ मार्च २०२०. हिंदूंचा सगळ्यात मोठा सण होता गुढीपाडवा. पंतप्रधानांनी आवाहन केलं, कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं यासाठी उद्या सकाळी साडे आठ ते साडे नऊ एक तास घरातील देवघरात एक दिवा लावा आणि आपली खिडकी असेल, गॅलरी असेल, गच्ची असेल, आपल्या घरासमोर अंगण असेल, जिथे शक्य होईल तिथे येऊन घंटा, थाळ्या, जे शक्य असेल ते वाजवा.''

राम मंदिराचं बांधकाम सुरू करायचा निर्णय राम मंदिर न्यासानं घेतला. पण त्यासाठी तिथे असलेली रामाची मूर्ती अस्थायी मंदिरात नेणं आवश्यक होतं. '२०१९ मध्ये निर्णय झाला. त्यासाठी मुहूर्त शोधला गेला आणि नेमका त्याच वेळी दुर्दैवानं संपूर्ण जगाला कोरोनानं गाठलं. जग बंद पडलं. भारतात या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतही बंद होणं भाग होतं.

योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं, रामलल्ला असा सुकासुका कसा जाणार? अयोध्यावासीयांसह मोठी मिरवणूक अस्थायी मंदिरापर्यंत गेली पाहिजे. आता गर्दी करायला परवानगी नाही. सगळा भारत बंद केलाय. करायचं काय? पंतप्रधान म्हणाले, तु्म्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. त्यानंतर तीन सिक्युरिटी गार्ड, पाच महंतांना सोबत घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वत:च्या डोक्यावर, रामलल्लाची मूर्ती घेतली आणि १.३ किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरात ठेवली आणि त्यावेळी संपूर्ण भारत थाळ्या वाजवत होता. त्यानंतर पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ आणि चंपत राय यांना फोन करुन विचारलं, एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का? संपूर्ण भारत रामलल्लासाठी थाळ्या वाजवत होता. यापेक्षा अजून वेगळं काय असावं आणि त्यानंतर सुरु झालेलं मंदिराचे निर्माण. या २२ जानेवारीला ते स्वप्न पूर्ण होतंय. असा सर्व दावा सोलापूरकर यांनी केला आहे.

या मागील सत्य नेमकं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चला नाही तर 22 मार्चला थाळी वाजवण्यास सांगितले होते. त्या दिवशी गुढीपाडवा हा सण नव्हता.

दुसरा दावा सोलापूरकरांनी असा केला की, सकाळी साडे आठ ते साडे नऊ असा तासभर घंटानाद, थाळीनाद करा, असं आवाहन मोदींनी केलं. मात्र असे नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटं थाळी वाजवण्याचं आवाहन केलं होते.

तसेच ज्यावेळी मोदींनी देशाला हे आवाहन केलं होते त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी प्रतिसाद दिला होता मात्र ते अयोध्येत नसून गोरखपूरमध्ये होते.

कोण आहेत राहुल सोलापूरकर?

राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत,

आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे.

नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे.

थरथराट या सिनेमाच्या टकलु हैवान या भूमिकेमुळे प्रसिध्दी मिळाली.

अफलातून, आई शप्पथ, गोंदण ,जखमी कुंकू, धुमाकूळ, नशीबवान, नाथा पुरे,

बळीराजाचं राज्य येऊ दे या सिनेमात काम केले आहे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका