ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं.
अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळी झाडून घेतल्या. या प्रकरणात आता 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रोहित साहू आणि मेहूल पारेख अशी त्यांची नावं आहेत.
अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात काल रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. आज सकाळी 5.45 वाजता त्यांचं शव त्यांच्या निवास्थानाकडे घेऊन गेले. आज अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.