मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार असून सकाळी 11 वाजता बजेट सादर होईल. अर्थमंत्री सीतारामन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या बजेटमध्ये काय काय घोषणा होणार हे पाहणं आता महत्वाचे असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, प्रचंड अपेक्षांनी देश ज्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पाहतोय, त्यात आमच्या महाराष्ट्राला आमचा वाटा मिळेल का? •मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र मिळेल का? यूपीएने ते मुंबईला दिले आणि भाजपने गुजरातला गिफ्ट म्हणून नेले. जे अद्याप सुरुही झालेले नाही. त्याच जमिनीचा भूखंड मुंबईकडून घेऊन बुलेट ट्रेनला मोफत दिला गेलाय. गिफ्ट सिटी रद्द करू नका, पण आम्हालाही एक द्या!
यासोबतच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, पुण्याला दीर्घ काळापासून ज्याची प्रतिक्षा आहे तो नवीन विमानतळ मिळेल का? आणि मुंबईसाठीही फायदेशीर ठरेल असा विमानतळ पालघर जिल्ह्याला मिळेल का? • आमच्या शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज मिळेल का?