महाराष्ट्र

मित्राकडे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा भंडारपुळे समुद्रात बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | रत्नागिरी : रायगड येथून रत्नागिरीत मित्राकडे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा भंडारपुळे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

सागर देवदास शिर्के (वय 33, रा.पनवेल, रायगड) असे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, सागर याच्या नातेवाईकांनी मृत्यूचे नेमके कारण कळायला हवे अशी मागणी केल्याने त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सागर याचा पनवेल येथील जॉब सुटल्यावर तो रत्नागिरी भंडारपुळे येथे मित्राकडे फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सागर व मित्र असे दोघेही आपल्या आई-वडिलांना पंढरपूर येथे रत्नागिरी एसटी बसमध्ये बसवून परतत असताना ते दोघेही भंडारपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. 

यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात चालताना सागर याला पाण्याचा अंदाज न तो बुडू लागला. हे पाहताच त्याच्या मित्राच्या भावाने आरडाओरडा केला. स्थानिकांनी तातडीने पाण्याबाहेर सागरला उपचारासाठी वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागरला मृत घोषित केले.

सोमवारी सायंकाळी त्याचे नातेवाईक दाखल झाल्यावर त्याच्या मृतदेहाच रात्री उशिराने रत्नागिरी सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी 11.15 वा. घडली असून जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली ऐहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे राहुल जाधव करत आहे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...