संजय राठोड : यवतमाळ | सध्या सोशल मिडियावर एक तरुण, रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल करतानाचा व बांधकाम विभागाच्या संबंधित कंत्राटदारांचा भांडाफोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे पुसद यवतमाळ बांधकाम विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
हा व्हिडिओ महागांव तालुक्यातील आणि पुसद मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाकन या गावातील आहे. सध्या पोखरी ते माळहिवरा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे.नऊ किलोमीटरपैकी सहा किलोमीटरचा रस्ता अतिशय निष्कृट दर्जाचा बनवल्याचा आरोप अविनाश सवाई राठोड या युवकाने केला आहे. पोखरण ते माळहिवरा दरम्यान वाकन हे गाव आहे. त्याच दरम्यान रस्त्यावर डांबरीकरण सुरू आहे.
बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने कंत्राटदार रस्त्याचे काम सिंगल कोटवर करीत असल्याने रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.