महाराष्ट्र

अमरावती | दीड हजारांची लाच घेताना महिला सरपंच ताब्यात

Published by : Lokshahi News

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे गावात तार कंपाउंड मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरीसाठी दीड हजार रुपये लाच मागणाऱ्या जळका पटाचे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सोनाली संजय पिलारे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्यासोबत पती संजय पिल्लारे व भासरा विजय पिल्लारे हे देखील सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्वांना अटक केली.

तक्रारदार मजुरांनी गावातील तार कंपाउंड व नालीचे बांधकाम मार्च 2021 मध्ये पूर्ण केले. या कामाच्या मजूरीचा 22 हजार 700 रुपयांचा धनादेश सेंट्रल बँकेत तक्रार झाल्याचे नावे मंजूर झाला या धनादेशावर ग्रामसेवकाची सही झाली होती. मात्र सरपंचाची सही यात बाकी होती, मात्र सरपंच महिलेने धनादेशावर सही करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तर स्वतःजवळ सरपंच पतीने चेक ठेवला होता.

दरम्यान तक्रारदाराने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचा समक्ष लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने एकाच कुटुंबातील महिला सरपंच,त्यांचे पती व भासरे यांचे विरुद्ध तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...