महाराष्ट्र

बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : तालुक्यातील कटफळनजीक बारामतीतील विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले. कटफळ रेल्वे स्टेशनापासून काही अंतरावरच हे विमान कोसळले. यात दोन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहे. बारामती विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील शिकाऊ विमान कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील महिला पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे. विमान तळावरून टेकऑफ केल्यानंतर हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ते नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी