महाराष्ट्र

धक्कादायक! डॉक्टरच्या हातातून नवजात बाळ निसटलं अन्...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : राज्यात सध्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच, काहीशी नाशिकच्या वैद्यकीय रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हातातून निसटून एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ माजली असून कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.

माहितीनुसार, सदर घटना नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयातील घडली आहे. प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देत असताना डॉक्टरांच्या हातातून निसटून बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

तर, बाळ आधीच दगवल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. परंतु, कुटुंबियांना हा दावा फेटाळून लावला असून डॉक्टर दिशाभूल करत असल्याचे म्हंटले आहे. डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली. याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आता बाळाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अहवाल समोर येईल.

दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यापाठोपाठ नागपूरमध्येही नांदेडची पुनरावृत्ती घडली आहे. नागपूरच्या शासकीय मेयो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये मागील 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यूने राज्याचे लक्ष वेधले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही केली होती रेकी

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आजच शपथविधी; शासनाकडून राजपत्र जारी

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; दुसरा आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक